हिल हाफ मॅरेथॉन मंडप उभारणी

हिल हाफ मॅरेथॉन मंडप उभारणी
Published on: 

शेंद्र्यात चार सप्टेंबरपासून ‘मॅरेथॉन एक्स्पो’

सातारा, ता. २६ : सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी मॅरेथॉनचे १५ वे वर्ष असून, देशभरातून सुमारे १० हजार धावपटूंनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली आहे. यंदा ‘मॅरेथॉन एक्स्पो’ शुक्रवारी (ता. चार सप्टेंबर) आणि शनिवार (ता. पाच) शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या (कै.) अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात आयोजिला आहे.
या एक्स्पोच्या मंडप उभारणीचा प्रारंभ नुकताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या हस्ते झाला. त्यावेळी सातारा हिल हाफ मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे आणि सचिव शैलेश ढवळीकर, सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक अभिषेक भंडारी, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख महेंद्र जाधव उपस्थित होते.
यंदाही एक्स्पोसाठी ‘जर्मन हँगर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मंडपाचे संकल्पनात्मक डिझाईन स्वतः संयोजन समितीचे अध्यक्ष पंडित यांनी केले आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या धावपटू आणि नागरिकांना प्रशस्त, सुरक्षित व आरामदायी वातावरण मिळावे, याचा विचार डिझाईनमध्ये केला गेला आहे. हा मंडप संपूर्ण वातानुकूलित असणार आहे. या एक्स्पोला सातारकरांनी भेट द्यावी, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, जॉइंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर, उपाध्यक्ष ढाणे, सचिव ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी केले आहे.
--------------------
चौकट

विशेष आकर्षण

एक्स्पोत देशातील विविध नामांकित संस्था, कंपन्यांचे उत्पादनांचे व सेवांचे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये स्पोर्टस्, रनिंग, फिटनेस, आरोग्य, पोषण तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादने व उपक्रमांची माहिती धावपटू आणि नागरिकांना मिळेल. त्यामुळे धावपटूंसोबतच फिटनेस व आरोग्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठीही हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरणार आहे.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara 17-year-old girl death case
Berlin Marathon 2026 Satara Athlete Yash Muchandi Completes 42195 Kilometres in 3 Hours 28 Minutes 57 Seconds
shambhuraj desai, cm devendra fadnavis and eknath shinde
Satara Traffic Diversion
Marathi News Esakal
www.esakal.com