बालरोगसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी

बालरोगसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी
Published on: 

‘बालरोग’साठी १३ कोटी ५० लाख

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मंजूर

सातारा, ता. ३० ः सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे येथील मेडिकल कॉलेजच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाकरिता यंत्रसामग्री व साधनसामग्री (टर्न की सहित) खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा मेडिकल कॉलेज व रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा जनसामान्यांना लाभ व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
याबद्दल मंत्री भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.
सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण व्हावे आणि या कॉलेज व रुग्णालयातील सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू व्हावेत, यासाठी मंत्री भोसले यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, त्यांच्या पाठपुराव्यातूनच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मेडिकल कॉलेज, रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र (एनआयसीयू) विभागासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री व साधनसामग्री (टर्न की सहित) खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. नुकतीच यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीमधून कॉलेज, रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधने खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा लाभ सातारा जिल्ह्यातील रुग्णांना झाला पाहिजे. यासाठी हे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय तातडीने सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, असे मंत्री भोसले यांनी नमूद केले.

-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.