सातारा पालिकेची गुरवारी सभा

सातारा पालिकेची गुरवारी सभा
Published on

सातारा पालिकेची
गुरुवारी सभा
सातारा, ता. १७ : पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २७) नगराध्‍यक्ष अमोल मोहिते यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजिण्‍यात आली आहे. या सभेपुढे तीन विषय मंजुरीसाठी ठेवण्‍यात आले आहेत.
गेल्या सभेतील कार्यवृत्तांत कायम करणे, महादरे तळे परिसर विकसनाच्‍या अनुषंगाने तयार केलेल्‍या अहवालावर चर्चा करणे, पालिका मुख्‍याधिकाऱ्यांसाठी निवासस्‍थान तयार करणे हे विषय चर्चेसाठी गुरुवारी होणाऱ्या सभेपुढे ठेवण्‍यात येणार आहेत. सभेसाठी फक्‍त तीन विषयांची विषयपत्रिका तयार करण्‍यात आली आहे. यापूर्वीच्या सभांसाठी जंबो विषयपत्रिका तयार करण्‍यात येत असे. या पत्रिकेवरील सगळ्या विषयांचे वाचन सभेदरम्‍यान होत नसल्‍याने त्‍यास सभागृहात उपस्‍थित नगरसेवक हरकत घेत. यावरून अनेकदा सभागृहात हमरीतुमरी होऊन त्‍याचे पडसाद पालिकेच्‍या अंतर्गत कारभारावर पडत असत. सभा कामकाजाच्या‍ अनुषंगाने काही नगरसेवकांनी लेखी स्वरूपात पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्‍या होत्‍या. विषयांच्या‍ वाचनावरून होणारी वादावादी टाळण्‍यासाठीच गुरुवारी होणाऱ्या सभेसाठी फक्‍त तीन विषयांचा समावेश असणारी पत्रिका तयार केल्‍याची माहिती नगरसेवकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com