

शिक्षक महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी घोरपडे
जिल्हा कार्यकारिणी जाहीर; सचिवपदी तोरणे, उपाध्यक्षपदी निकम
दहिवडी, ता. १८ : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्षपदी विशाल घोरपडे यांची, तर सचिवपदी चंद्रकांत तोरणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया मार्गदर्शक राजेंद्र पवार, मनोहर यादव, महासंघाचे संस्थापक संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल निकम व सुमित भंडलकर, कार्याध्यक्षपदी केतन भिसे, सहसचिवपदी सौरभ चव्हाण व अनिकेत शिंदे, खजिनदारपदी राहुल सावंत, सातारा जिल्हा संघटकपदी दीपक ढाणे, प्रदीप शेळके, प्रकाश भोसले, अजिंक्य जांभळे व तुषार घाडगे, सातारा जिल्हा समन्वयक मयूर संकपाळ, सातारा जिल्हा सदस्य रसिका सापते, अनिता गायकवाड, पूजा पवार, शुभदा झनझणे, अकाशी पाटील, रवींद्र मोहिते, ऋषिकेश पवार, पिंकू खिलारे, सनी जाधव, सूरज नवसे, धुळा कोळेकर व नामदेव गुरव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून अक्षय आर्डे, तर सातारा जिल्हा सहप्रसिद्धी सचिव विकास माने व रियाज अत्तार यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नूतन कार्यकारिणीचे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले.
............
07531
विशाल घोरपडे
B07530
चंद्रकांत तोरणे
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.