पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता खूला अतिक्रमण

पोवई नाका, बॉम्बे रेस्टॉरंट रस्ता खूला अतिक्रमण
Published on

कोट्यवधींच्या काँक्रिटच्या रस्ता विक्रेत्यांचे बस्तान

पोवईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौकदरम्यान चालकांची कसरत, प्रशासनाची बघ्याची भूमिका

सातारा, ता. ८ ः सातारा शहराच्या विकासासाठी हाती घेतलेल्या पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गाचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील एका रस्त्याच्या मार्गिकेचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, वाहनधारकांनी मार्गिका खुली करण्यात आली आहे. दरम्यान या रस्त्यावरील जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोरील पदपथाचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सातारा-कोरेगाव-पंढरपूर या मार्गावरील पोवई नाका ते बाँबे रेस्टॉरंट या भागाचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण काम सुरू आहे. हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रयत्नशील आहेत. सुमारे ५२ कोटींच्या निधीतून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पोवई नाका ते बाँबे रेस्टॉरंट या मार्गावरील जिल्हा न्यायालयाच्या बाजूचे रुंदीकरण, सुशोभीकरण, खडीकरण व काँक्रिटीकरण, बंदिस्त, फुटपाथ बांधणे हे काम केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने रविवारपासून पोवई नाका, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, विसावा चौक ते बाँबे रेस्टॉरंटच्या बाजूची मार्गिका वाहनधारकांसाठी खुली करण्यात आली आहे.
दरम्यान या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने जिल्हा परिषद मैदान ते जिल्हा परिषद कार्यालय या मार्गावरील पदपथावरील किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्यांनी त्यांचे व्यवसाय आता जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरील पदपथावर थाटला आहे. यामुळे पदपथावरून नागरिकांना चालण्यास अडचण जाणवत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे पदपथावरील विक्रेत्यांना अन्यत्र जागा देऊन पदपथ चालण्यासाठी रिकामा होणे गरजेचे आहे.


कोट
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यात येतील. आवश्‍यकता भासल्यास वेळोवेळी पालिकेचीही मदत घेतली जाईल.
- आर. आर. आंबेकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा.

PNE26W47811 आणि
सातारा ः पोवई नाका ते बाँबे रेस्टॉरंट चौक मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पोवई नाका ते कोरेगाव मार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम झाल्याने पोवई नाका येथील मार्गिका वाहनधारकांसाठी खुली करण्यात आली आहे.
दुसऱ्या छायाचित्रात (PNE26W47808 ) जिल्हाधिकारी निवासस्थान नजीकच्या पदपथाचा विक्रेत्यांनी घेतलेला ताबा. (प्रमोद इंगळे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com