सातारा प्रायमरी स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन

सातारा प्रायमरी स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन
Published on: 

एनआयई बातमी

सातारा प्रायमरी स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

सातारा, ता. २२ ः रयत शिक्षण संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एकपात्री प्रयोग, गोष्टी, कविता आणि भाषणे सादर करून वाचनाची आवड, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्याचे सुंदर दर्शन घडविले. या वेळी हात धुवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे आणि नियमित हात धुण्याचे महत्त्व विद्या राऊत यांनी हात धुण्याची योग्य पद्धत सांगून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले. एआय विभागप्रमुख चैताली शेलार यांनी उपक्रमाचा आढावा सादर केला.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना एआय प्रमाणपत्रे, चित्रकला स्पर्धेची बक्षिसे तसेच स्काऊट-गाइडची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
याप्रसंगी ‘सकाळ’ यिनचे जिल्हा समन्वयक तानाजी पाटील, सहाय्यक वितरण व्यवस्थापक संदीप निकम उपस्थित होते. त्यांनी वाचनाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक धनंजय पवार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पालक-शिक्षक संघाच्या सदस्या सुप्रिया राजेशिर्के, रूपाली गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
रोहित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

PNE26W59763
सातारा ः संस्थेच्या सातारा प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


...............................................चिंचकर........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com