मलकापूर क्रीडा चर्चासत्र
सातारा, कऱ्हाडच्या स्टेडियमवर सिंथेटिक ट्रॅक करा
अशोकराव थोरात; ॲथलेटिक्सच्या प्रश्नांवर चर्चासत्र
मलकापूर, ता. २४ : कऱ्हाड व सातारा येथील स्टेडियमवर अद्ययावत सिंथेटिक चारशे मीटरचा ट्रॅक तातडीने तयार व्हावा, याकरिता संघटनेच्या वतीने शिष्टमंडळ तयार करून त्या संबंधित यंत्रणांशी बैठक करून ही मागणी लावून धरावी व पूर्ण व्हावी, असे प्रतिपादन अशोकराव थोरात यांनी केले.
जिल्ह्यातील ॲथलेटिक्समधील प्रमुख अडचणी व पुढील नियोजन या अनुषंगाने स्टार इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात विविध मान्यवर व क्रीडा प्रशिक्षकांच्या उपस्थितीत चर्चासत्रात श्री. थोरात बोलत होते. सातारा जिल्हा व कऱ्हाड तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने व येथील मळाई ग्रुप यांच्या सौजन्याने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, सामना समिती अध्यक्ष ॲड. भरत पाटील, संस्थापक श्रीराम कदम, भारतीय ॲथलेटिक्स कोच सुभाष पवार, आंतरराष्ट्रीय कोच बळवंत बाबर, दिलीप चिंचकर, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, राष्ट्रीय खेळाडू संजय वाटेगावकर, राजगुरू कोचळे, राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र लिबे, माजी खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक पवन पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, राष्ट्रीय खेळाडू शशिकांत पाटील, महेंद्र भोसले, प्रा. दीपक डांगे, आदर्श क्रीडा संघटनेचे जगन्नाथ कराळे, जयवंत पाटील व योगेश खराडे, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
संजय वाटेगावकर यांनी सातारा जिल्हा संघटनेची थोडक्यात माहिती दिली. यामध्ये सातारा जिल्हा संघटनेचा २०२५-२६ वार्षिक क्रीडा अहवालाचे वाचन राजगुरू कोचळे यांनी केले. यावेळी चर्चासत्रात श्री. लिबे, श्री. चिंचकर, श्री. पाटील, श्री. भोसले, श्री. दत्तात्रय पाटील, संजय राठोड तसेच सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांनी चर्चासत्रात भाग घेतला. योगेश खराडे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र भोसले यांनी आभार मानले.
.....
चौकट
एकमताने मांडलेले ठराव
* सातारा व कऱ्हाड येथील स्टेडियमवर चारशे मीटरचा अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक तातडीने तयार व्हावा, याकरिता संघटनेतर्फे शिष्टमंडळ तयार करून त्या संबंधित यंत्रणा यांच्याशी बैठक करून ही मागणी लावून धरावी.
* सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशन पुनर्जीवित करावी व चालना द्यावी.
* सर्व जिल्ह्यातील नगरपालिका यांनी क्रीडा विकासासाठी त्यांना असलेल्या बजेटच्या पाच टक्के शासन निर्णयानुसार बजेट हे क्रीडा विकासासाठी वापरावे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणे.
* सातारा जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी खेळाडूंचा सत्कार समारंभ घेण्यात यावा.
.....
फोटो
01332
मलकापूर : चर्चासत्रात बोलताना अशोकराव थोरात. त्या वेळी पांडुरंग शिंदे, ॲड. भरत पाटील, श्रीराम कदम, सुभाष पवार, बळवंत बाबर, दिलीप चिंचकर आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

