पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनच्या वादातून चाकूने वार; एकजण गंभीर जखमी साठेगावातील घटना; सरडे येथील सहा जणांसह आठ जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनच्या वादातून चाकूने वार; एकजण गंभीर जखमी  साठेगावातील घटना; सरडे येथील सहा जणांसह आठ जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
Published on: 

पाइपलाइनच्या वादातून एकावर चाकूने वार

साठेगावातील घटना; सरडेतील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दुधेबावी, ता. ३० : पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन वारंवार फुटून गावाचा पाणीपुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना साठेगाव (ता. फलटण) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सरडे येथील सहा जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील वसंत बगाडे (वय ४३, रा. साठेगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, की वाजेगाव ते बारामतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सरडे गावातील काही ठेकेदार शासनाच्या परवानगीने माती व वाळूची वाहतूक करीत आहेत. या वाहतुकीमुळे साठेगावला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वारंवार फुटत असून, त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा खंडित होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी तहसीलदारांकडेही तक्रार केली होती.
आज सकाळी याच कारणावरून ग्रामस्थांनी रस्त्यावर उभे राहून ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना या मार्गावरून वाहतूक करू नये, असे समजावून सांगितले. त्यावेळी वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीत झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुनील बगाडे यांच्यावर आरोपींनी हल्ला केला. त्यापैकी एकाने चाकूने त्यांच्या पाठीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी बापूराव चव्हाण, आविष्कार ऊर्फ गझनी भोसले, शुभम रिटे, मयूर खाडे, अजय सोनावणे, गौरव भोसले (सर्व रा. सरडे) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी बगाडे यांना तातडीने फलटण येथील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिस करीत आहेत.

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.