

सातगाव पठारच्या शिवारात समृद्धीची हिरवाई
राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून सातगाव पठार परिसरात सिंचनाच्या सुविधांना चालना मिळाली. सातगाव पठार परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेळ नदीवरील २५ बंधारे महत्त्वपूर्ण ठरले आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि पाणीसाठ्यांना आधार मिळाला.
- अशोक बाजारे,
उद्योजक, सातगाव पठार (ता. आंबेगाव)
आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा विचार करताना सातगाव पठार परिसरातील शेती आणि जलसंधारणाच्या कामांचा विशेष उल्लेख करावा लागतो. एकेकाळी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या भागातील शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने पिकांचे उत्पादनही अपेक्षित मिळत नव्हते. मात्र, राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या परिसरात सिंचनाच्या सुविधांना चालना मिळाली. विशेषतः वेळ नदीवरील २५ बंधाऱ्यांमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत झाली. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या बटाटा उत्पादनात वाढ होण्यासाठी झाला. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती अधिक उत्पादनक्षम बनली आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडू लागला. या भागातील मुख्य बटाटा पिकासाठी तुषार सिंचनासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळून देण्यात दिलीप वळसे पाटील यांचे योगदान आहे. पीक विमा योजनेत बटाटा पिकाचा समावेश व्हावा म्हणून वळसे पाटील यांचे राज्य व केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजना लागू झाल्यानंतर बटाटा उत्पादकांना आर्थिक मदत व स्थैर्य मिळणार आहे.
वेळ नदीवरील २५ बंधाऱ्यांचा आधार
सातगाव पठार परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वेळ नदीवरील २५ बंधारे महत्त्वपूर्ण ठरले आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि पाणीसाठ्यांना आधार मिळाला. बंधाऱ्यांमुळे भूजलपातळी टिकविण्यास मदत झाली. परिणामी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले. बटाटा पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे क्षेत्रही वाढण्यास मदत झाली. शेतकऱ्यांना केवळ पाण्याची उपलब्धता करून देणे एवढ्यापुरता विकास मर्यादित न ठेवता शेतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. पाणी असेल तर शेतकरी वर्षभर विविध पिकांचे नियोजन करू शकतो. त्यातून रोजगारनिर्मिती होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. सातगाव पठार परिसरातील जलसंधारणाच्या कामांनी याच विकासदृष्टीला बळ दिले आहे.
दुष्काळी भागाची कृषीसमृद्धीकडे वाटचाल
आंबेगाव तालुक्याचा पूर्वीचा दुष्काळी चेहरा बदलण्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि सिंचन या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले. डिंभे धरण, घोडनदी, मीना नदी, कुकडी प्रकल्प आणि विविध जलसंधारणाच्या कामांमुळे शेतीसाठी पाण्याच्या उपलब्धतेत सुधारणा झाली. बंधारे, पाझर तलाव, जलसंधारण आणि अन्य सिंचन योजनांचा फायदा ग्रामीण भागाला झाला. पूर्वी पावसाळ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकपद्धतीत बदल करता येऊ लागला. पूर्व भागातही बटाटा, कांदा, ऊस, भाजीपाला आणि अन्य पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध झाले. शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय वाढल्याने शेतकरी कुटुंबांना नियमित आर्थिक आधार मिळाला.
दुग्धव्यवसायातून अर्थव्यवस्थेला बळ
सातगाव पठारासह आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विकसित झाल्याने बाजारपेठांशी संपर्क वाढला. शेतमाल वेळेत बाजारात पोहोचविणे शक्य झाले. शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्येही मोठी प्रगती झाली. पेठ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम सुरु आहे. जवळपास प्रत्येक गावात आरोग्य उपकेंद्र आहे. पेठ वीज उपकेंद्र असल्याने योग्य दाबाने कृषी पंपांना घरगुती वीजपुरवठा होत आहे.
विकासाची सातत्यपूर्ण वाटचाल
दिलीप वळसे पाटील यांनी सन १९९०पासून आंबेगावच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकार, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, गृह, अर्थ आणि कृषीपूरक उद्योग अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवाचा फायदा मतदारसंघाला झाला आहे. प्रशासनातील अनुभव आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याची क्षमता यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली. सातगाव पठारच्या शिवारात वेळ नदीवरील बंधाऱ्यांमुळे बटाटा उत्पादनाला मिळालेली चालना ही जलसंधारणातून समृद्धीकडे जाणाऱ्या प्रवासाचे महत्त्वाचे उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात पाण्याचे महत्त्व किती मोठे असते, हे या कामातून स्पष्ट होते.
आंबेगाव-शिरूर मतदारसंघाच्या विकासाची ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहावी. शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अधिक समृद्धी यावी, हीच अपेक्षा! दिलीप वळसे पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.