

Irrigation Department Promises Site Inspection Following Farmers' Protest
Sakal
नारायणगाव : मीना नदीवरील पिंपळगाव येथील सतीकोन कोल्हापूर बंधारा मागील पंधरा दिवसापासून कोरडा पडल्यामुळे या भागात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. गुंजाळवाडी, वडगाव परिसरातील विंधन विहिरी व विहिरीची पाणी पातळी घटल्याने शेतातील उभी पिके, जनावरांचा चारा सुकला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वडज धरणामधून पिंपळगाव येथील बंधाऱ्यात तातडीने पाणी सोडावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.