
पुणे : हॉटेल व्यावसायिक सतीश सादबा वाघ यांचा सुपारी देवून खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. भाडेकरूनेच पाच लाख रुपयांची सुपारी देवून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींना गुरुवारी (ता. १२) वानवडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.