Satyajit Tambe : सत्यजित तांबेच्या उमेदवारीवर आमचे गणीत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satyajit tambe

Satyajit Tambe : सत्यजित तांबेच्या उमेदवारीवर आमचे गणीत नाही

पुणे : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये काँग्रेसमधील गोंधळ समोर आला. पण यामध्ये भाजपचाच हात असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही.

तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण तेथे सर्वजण उपस्थित होते. त्यामुळे हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली, त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यावरून सुरू झालेल्या चर्चेवर भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, ‘‘नाशिक पदवीधर मतदारसंघातून आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी राजेंद्र विखे पाटील यांचे नावही समोर आले होते. पण ऐनवेळी कोणालाही उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं गेल.

तांबे हे चांगले काम करत आहेत, पण त्यांना निवडणुकीत पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार धोरणात्मक निर्णय होईल.

फडणवीस हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा सुर असल्याने त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘ माझा असा कोणताही विचार नाही. पुणेकरांवर माझं आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. पण मी नागपूरमध्येच बरा आहे.

एमपीएसचीचा नवा अभ्यासक्रम २०२५पासून लागू करावा यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत, यावर फडणवीस म्हणाले, ‘‘कधीतरी यूपीएससी लेव्हलचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. आत्ताचे म्हणतात २०२५ ला करा मग तेंव्हाचे म्हणतील २०२७ला करा, याबाबत योग्य तो निर्णय घेऊ.