

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १९ ः राजकीय बदला घेण्याच्या हेतूने माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली तपास संस्था काम करीत असल्याचे ते म्हणाले.
पंजाबची विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे मला अटक झाली असल्याचे जैन यांनी राऊज अव्हेन्यू न्यायालय परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिल्ली जल मंडळाच्या निविदेतील अनियमितता प्रकरणी जैन यांच्यासह सहाजणांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काल रात्री अटक केली. हवाला व्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात १८ महिने काढलेले सत्येंद्र जैन जल मंडळ गैरव्यवहारप्रकरणातील अटकेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
अटक झालेल्यांमध्ये जल मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय यांचा समावेश आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदा नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप जैन यांच्यावर आहे. पोलिसांनी यासंदर्भात २०२४ मध्ये गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षीही त्यांची चौकशी झाली होती. अटक झालेल्या अन्य आरोपींमध्ये अंकित श्रीवास्तव, राजकुमार कुर्रा, नागेंद्र यादव आणि पंकज वर्मा यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.