कुडाळ जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी सैारभ शिंदे यांची निवड

कुडाळ जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी सैारभ शिंदे यांची निवड

Published on

जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी सौरभ शिंदे

साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रसिंहराजेंची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडीचे पत्र

कुडाळ, ता. २४ : जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे कुडाळ गणाचे सदस्य व प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांची निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गटनेतेपदी निवड झाल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत श्री. शिंदे यांना प्रदान करण्यात आले.
सातारा येथील मंत्री भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी पंचायत समिती सदस्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे नवनिर्वाचित सदस्य गोरख महाडिक व चारुशीला पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री भोसले यांनी सदस्यांना मार्गदर्शन करताना आगामी काळातील कामाची दिशा स्पष्ट केली आणि पक्ष संघटना मजबुतीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली.
ते म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या ध्येयधोरणांमुळे विजयी झालेले आहात. तुम्ही निवडून आल्यामुळे आता खरी जबाबदारी सुरू झाली असून, सर्व सदस्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व समाजातील विविध घटकांना न्याय दिला पाहिजे. पक्षाचे काम प्रामाणिकपणे व अधिक जोमाने तळागाळापर्यंत पोहोचवा.’’
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत आणि ज्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी मेहनत घेतली आहे, त्यांनाही न्याय द्यावा, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.
श्री. शिंदे यांच्या निवडीमुळे जावळी पंचायत समितीत सत्ताधारी पक्षाची पकड अधिक मजबूत होणार असून, अनुभवी नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास वेगवान होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

---------------------------

00947
सातारा : जावळी पंचायत समितीच्या गटनेतेपदी अधिकृत निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना सौरभ शिंदे. (महेश बारटक्के : सकाळ छायाचित्रसेवा)

------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com