लोकशाही मजबुतीसाठी जनतेने सतर्क रहा : दीप चव्हाण

लोकशाही मजबुतीसाठी जनतेने सतर्क रहा : दीप चव्हाण
Published on: 

PNE26W54521
अहिल्यानगर ः काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘लोकशाही वाचवा सप्ताह’ सुरू करण्यात आला.
---------------
लोकशाही मजबुतीसाठी सतर्क रहावे
दीप चव्हाण ः लोकशाही वाचवा सप्ताहास प्रारंभ
अहिल्यानगर, ता. २ ः महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांनी देशाच्या लोकशाही मूल्यांना आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला दिशा दिली. आजच्या काळात लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान देशभर ‘लोकशाही वाचवा सप्ताह’ आणि ‘मत वाचवा - देश वाचवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांसोबत संयुक्त बैठक, त्यानंतर जिल्हास्तरीय मोर्चाचे आयोजन, तसेच नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हास्तरीय मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेऊन जाणे, तसेच तेथे भारतीय संविधानातील कलम ३२६ चे सार्वजनिक वाचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. बापू चंदनशिवे व प्रा. डॉ. बाळासाहेब पवार यांची यावेळी भाषणे झाली. शहर ब्लॉक अध्यक्ष फिरोज शफी खान, मोबीन शेख, अजित कुऱ्हाडे, विवेक कसबे, अनिकेत भिंगारदिवे, कृष्णा पवार, गायत्री पुंड, रिया शेख, मलाला चंदनशिवे, शहर जिल्हाध्यक्ष क्रीडा विभाग प्रवीण गिते, माजी नगरसेवक फैयाज शेख, अखिल सय्यद आदी उपस्थित होते. काँग्रेस शहर जिल्हा ब्लॉक अध्यक्ष फिरोज शफी खान यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com