

-- पान ६ -- फोटो B17819
पाणी नसेल तर, फळधारणा नकोच
डॉ. कापसे : लाडसावंगी येथे २६९ वा द्वादश मेळावा
लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्याकडील पाणी नक्की किती आहे, याचा हिशेब करून फळबागा वाचवण्याचे नियोजन करावे. पाणी जर कमी असेल तर मोसंबी बागायतदारांनी आंबिया बहार घेणे टाळावे. डाळिंब, आंबा बागायतदारांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची फळधारणा घेण्याचे अट्टहास करू नये असा सल्ला फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.
लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, ऍग्रो इंडिया गट शेती संघ आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा २६९ वा द्वादश मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी डॉ. कापसे यांनी ‘दुष्काळी परिस्थितीत फळबागा कशा वाचवाव्यात,’ याविषयी मार्गदर्शन केले. डॉ कापसे म्हणाले की, बागायतदारांनी आंब्याला मोहर येणार तो लगेच काढून न टाकता थोडा सेटिंग होईपर्यंत थांबून नंतर काढून टाकावा.
झाडावर नवीन पालवी आल्यास ती काढून टाकावी. तसेच झाडाची पानांची थोडीफार फांद्या कट करून विरळणी करावी. झाडावर पानाद्वारे बाष्पीभवन रोखण्यासाठी पाच ते सहा टक्के केओलीन या बाष्पीभवन रोधकाचा फवारणी करून वापर करावा. पान, देठाचे परीक्षण करून झाडामध्ये जमिनीतून किंवा फवारणीद्वारे पोटॅश फवारून कमतरता बिलकूल राहणार नाही याची काळजी घ्यावी.
कापूस तज्ञ डॉ. एस. एस. माने यांनी आता काढणीस सुरुवात झालेल्या कापसामध्ये सेंद्रिय बोंड आळी, तसेच इतर माध्यमातून काळजी घ्यावी आणि आपली उत्पादकता शक्यतो वाढवावी याविषयी शास्त्रीय मार्गदर्शन केले.
यावेळी बाबासाहेब नारायण पडुळ, विठ्ठल भोसले, रमेश शिंदे, सुदाम पवार संस्था चेअरमन विजय काळे, सचिव विजय दाभाडे, आप्पा बोचरे यांच्यासह परिसरातील फळ बागायतदार व शेतकरी उपस्थित होते.
....फोटो B17819....
लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भगवानराव कापसे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.