#SaveRiver राम नदी घेणार मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले.

किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, वसुंधरा स्वच्छता अभियानचे अनिल गायकवाड, सागरमित्र व जलबिरादरीचे विनोद बोधनकर या वेळी उपस्थित होते. 

चंद्रचूड म्हणाले, ‘‘राम नदीची दुरवस्था झाली आहे. वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध या ठिकाणांहून ही नदी वाहत जाऊन पुढे मुळा नदीला मिळते. पुनरुज्जीवन आराखड्यात नदीचे एकूण १८ विभाग केले आहे. प्रत्येक विभागानुसार प्राधान्यक्रम ठरवून कृती कार्यक्रम ठरविला आहे.’’

चित्राव म्हणाले, ‘‘चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही गेली १३ वर्षे पर्यावरणसंवर्धनासाठी जनजागृती करत आहोत. या अभियानात पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ, शहरातील ३५ महाविद्यालयांतील स्वयंसेवक, किर्लोस्कर समूहाच्या तीन कंपन्या आणि स्थानिकांच्या सहकार्याने राम नदी संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला आहे. समाजातील घटकांच्या सहभाग यामध्ये आहे.’’

वाढत्या शहरीकरणामुळे होणारी पर्यावरणाची हानी वेळीच रोखणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. शैलजा देशपांडे, डॉ. सचिन पुणेकर, डॉ. गुरुदास नूलकर, शैलेंद्र पटेल, वैशाली पाटकर, केतकी घाटे, धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते. 

देशातील अनेक नद्यांची दुरवस्था झाली आहे. त्या पूर्वस्थितीत आण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागजागृती होण्यासाठी नदीसंवर्धन दिन महत्त्वाचा आहे. राम नदी पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून जलसंस्कृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
- विनोद बोधनकर, सागरमित्र जलबिरादरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save River Ram River