Kundmala Bridge Collapse : आम्ही बाहेर आलो अन् आवाज आला ...पुनावळे येथील महिलेचा थरारक अनुभव
Pune News : कुंडमळा पुलावरून आम्ही खाली उतरलो आणि काही मिनिटांत मोठा आवाज झाला. पूल कोसळल्याचा धक्कादायक अनुभव! अमृता पाठक यांनी पुलावर घडलेला थरारक क्षण सांगितला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात घडला.
पिंपरी: ‘आम्ही कुंडमळ्यात पोचलो तेव्हा खूप गर्दी होती. आलेल्या पर्यटकांना ‘पुलावर गर्दी करू नका’, असे सांगितले जात होते. मात्र, एकाच वेळी पुलावर पर्यटकांची गर्दी वाढली. त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थ दुचाकीवरून जायला निघाले.