सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

Published on

YSH26B04986
अकलूज : शेतकरी खरेदी-विक्री संघात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
.......
अकलूज शाळा नंबर तीन
अकलूज : जिल्हा परिषद प्राथमिक मुली नंबर ३ शाळेने प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीमध्ये लेक वाचवा लेक शिकवा, मुलींना शाळेत पाठवा, आपली घरे स्वच्छ ठेवा, मुलगी शिकली प्रगती झाली. यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. यानंतर प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका अंगुले यांनी केले. यावेळी लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हा परिषद अकलूज मुले नं. ४ शाळेत प्रतिमापूजन ललितागौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सतीश जाधव, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ललितागौरी गाणी यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नितीन बनकर यांनी आभार मानले.
........
अकलूज शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ
......
अकलूज शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात अध्यक्ष नितीनराजे निंबाळकर यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी अविनाश जाधव, उमेश मोहिते, गजूनाना शिंदे, शंकर क्षिरसागर, अधिराज्य क्षिरसागर, सचिव शुभम गोरे उपस्थित होते.
.........
अकलूज लोकायत लोकसंचलित साधन केंद्र
......
लोकायत लोकसंचलित साधन केंद्र अकलूज या संस्थेच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कश्मिरा लोहकरे (रत्नपारखी) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी लोकायत लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा व नूतन नगरसेविका प्रतिभा गायकवाड, जयमाला सगर, कामिनी ताटे-देशमुख, सचिव संगीता गडदे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. कश्मिरा लोहकरे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा इतिहास सांगत महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बालविवाह रोखण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com