Bhide Wada : भिडे वाड्यातील स्मारकाच्या कामाला वेग; महात्मा फुले वाडा स्मारकासाठी सरकारकडून २०० कोटींचा निधी

Savitribai Phule Memorial at Bhide Wada Expected to Be Completed by March 2027 : ऐतिहासिक भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम आता वेगाने सुरू आहे. मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. महात्मा फुले वाडा स्मारकासाठी सरकारने २०० कोटी रुपये दिले आहेत.
Savitribai Phule Memorial at Bhide Wada Expected to Be Completed by March 2027

Savitribai Phule Memorial at Bhide Wada Expected to Be Completed by March 2027

esakal

Updated on: 

पुणे : ‘‘ऐतिहासिक भिडे वाडा येथील सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम प्रारंभी संथगतीने सुरू होते. त्याबद्दल आम्ही मुंबईत तक्रारी केल्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्वतः या कामामध्ये लक्ष घातले. आता कामाला वेग प्राप्त झाला असून, मार्च २०२७ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे आश्‍वासन मिळाले आहे,’’ असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Loading content, please wait...