

University-level 'Avishkar' research competition from November 18
Sakal
पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या वतीने आयोजित ‘आविष्कार’ या विभागीय स्तरावरील संशोधन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेतून विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पुढील फेरी १८ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाच्या परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, सध्या या तारखा संभाव्य असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.