परीक्षा व मुल्यमापन मंडळाने एमसीक्यू बाबत माहिती देणारे परिपत्रक काढले पण परीक्षेच्या आधी एक आठवडा. गेले महिनाभर परीक्षेबाबत चर्चा सुरू असताना तेव्हाच अभ्यास कसा करावा हे सांगितले असते तर विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आणखी सोपे गेले असते असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा विभागाने हे पाऊल उचलल्या याबद्दल त्यांनी स्वागत केले.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बॅकलॉगची परीक्षा 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वी परीक्षा विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने परीक्षा कशी द्यावी याच्या टिप्स जाहीर केल्या आहेत.
'कोरोना'च्या प्रार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठाने 'एमसीक्यू' पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. अंतिम वर्षाची परीक्षा घेताना यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते, पण त्यावेळी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत टिप्स दिलेल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास कसा करावा?, प्रश्न कसे विचारले जाणार
यावर संभ्रम आहे त्यामुळे परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी हे परिपत्रक जाहीर केले आहे. याबाबत अधिक माहिती पुणे विद्यापीठाच्या unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बॅकलाॅग परीक्षेची तारीख ठरली; पुणे विद्यापीठाने वेळापत्रकात केले बदल
सूचना महिनाभर आधी हव्या होत्या
परीक्षा व मुल्यमापन मंडळाने एमसीक्यू बाबत माहिती देणारे परिपत्रक काढले पण परीक्षेच्या आधी एक आठवडा. गेले महिनाभर परीक्षेबाबत चर्चा सुरू असताना तेव्हाच अभ्यास कसा करावा हे सांगितले असते तर विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आणखी सोपे गेले असते असे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा विभागाने हे पाऊल उचलल्या याबद्दल त्यांनी स्वागत केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
टिप्स
अभ्यास कसा करावा ?
- सर्व व्याख्या, संज्ञा, कन्सेप्ट, महत्वाचे सुत्र लक्षात ठेवावेत
- महत्त्वाच्या मुद्द्यावर एमसीक्यू प्रश्न कसा येऊ शकतो व त्याचे उत्तर कसे असेल याचा विचार करा
- स्वतः प्रश्न व त्याचे चार पर्याय काढण्याचा सराव करा
- इंटरनेटवर संबंधित विषयाचे एमसीक्यू शोधा
एमसीक्यू प्रश्न कसे सोडवावेत ?
- परीक्षेत प्रश्न आल्यानंतर सर्व सूचना व्यवस्थित वाचन करा
- प्रश्न व पर्याय निच वाचा, गृहितकाच्या आधारे उत्तर न देता प्रश्न समजून घ्या.
- मेथड ऑफ एलिमिनेशन म्हणजे चुकीचे पर्याय बाजूला करून योग्य उत्तरेकडे जावे, त्यामुळे वेळेची बचत होते
- एमसीक्यू पद्धतीत वेळेला महत्त्व आहे, त्यामुळे सोपे प्रश्न आधी सोडवा.