पुणे विद्यापीठाने ‘एम.कॉम’च्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला

पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune UniversitySakal
Updated on: 

पुणे :इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाने ‘एम.कॉम’च्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या दूरशिक्षणच्या मास्टर्स ऑफ कॉमर्सच्या प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या परीक्षा सात ते दहा डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्याचे नियोजन होते. मात्र याच कालावधीत पाच ते वीस डिसेंबर दरम्यान ‘सीए फाऊंडेशन’ परीक्षा होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या दुरशिक्षणच्या ‘एम.कॉम’च्या पूर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती डॉ. काकडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pune municipal corporation encroachment crime
dcm sunetra pawar, sonabai dabhade and atul benake
Rajgad Fort Road Development
Rajgad Drinking Water Priority and Dam Repair