esakal | पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोहचवला ई पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

jayakar-library

अंतीम वर्षाची परीक्षा होणार असल्याने या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना "रिमोट ऍक्‍सेस'चा वापर करून परीक्षेची तयारी करणे शक्‍य होणार आहे, त्यामुळे याचा वापर वाढवावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोहचवला ई पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे, - गावाकडे राहिलेल्या मुलांच्या घरापर्यंत जयकर ग्रंथालयातील ई पुस्तकांचा ठेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पोहचवला. त्यामुळे लॉकडाऊमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी 14 हजाराहून जास्त साहित्य डाऊनलोड केले आहे.

कोरोनामुळे पुणे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश दिले, तसेच जयकर ग्रंथालयही बंद झाले. विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यास कसा करायचा हा प्रश्‍न पडला होता. त्यावर उपाय म्हणून जयकर ग्रंथालयाने विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे साडे पाच हजार विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यकांसाठी ऑनलाईन पुस्तके वापरण्यासाठी रिमोट ऍक्‍सेस दिला आहे. यामध्ये आठ हजार पेक्षा जास्त जर्नल्स आणि 9 हजार पेक्षा जास्त ई पुस्तकांचा समावेश आहे. त्याचा वापर करून विद्यार्थी त्यांच्या गावाकडे बसून त्यांना हवे ते ई पुस्तक, जर्नल्स यांचा अभ्यास करत आहेत. तर, प्राध्यापकही यामाध्यामातून विद्यार्थ्यांना नोट्‌स, रिसर्च पेपर उपलब्ध करून देत आहेत. मार्च ते जुलै पर्यंत प्रत्येक महिन्यात 14 हजार पेक्षा जास्त साहित्य विद्यार्थी व प्राध्यापकांनी डाऊनलोड केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जयकर ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल डॉ. संजय देसले म्हणाले, ""विद्यार्थी जेव्हा जयकरमध्ये बसून अभ्यास करत होते त्यावेळी त्यांना ऑनलाईन साहित्याचा वापर करता येत होता, पण बाहेर पडल्यारवर वापर करू शकत नव्हते. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना रिमोट ऍक्‍सेस दिला आहे. दर महिन्याला 14 हजार पेक्षा जास्त साहित्य डाऊनलोड झाले आहे.''

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बायोटेक्‍नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गच्चे म्हणाले, ""जयकर ग्रंथालयाने प्राध्यापकांना रिमोट ऍक्‍सेस दिला आहे. त्यावरून जर्नल्स, ई पुस्तके डाऊनलोड करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच नोट्‌सही उपलब्ध केल्या जात असल्याने त्याचा चांगला उपयोग होत आहे.''

वापर वाढविण्याचे आवाहन
लॉकडाऊनमुळे व विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या येणाऱ्या समस्येमुळे ऑनलाईन वापर कमी झाल्याचे दिसते. मात्र, आता अंतीम वर्षाची परीक्षा होणार असल्याने या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना "रिमोट ऍक्‍सेस'चा वापर करून परीक्षेची तयारी करणे शक्‍य होणार आहे, त्यामुळे याचा वापर वाढवावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डाऊनलोड करण्यात आलेले ई साहित्य
महिना डाऊनलोडची संख्या

जानेवारी 32,837
फेब्रुवारी   31497
मार्च  24645
एप्रिल  14000
मे  13,723
जून  14,221
जुलै  14,376
loading image