सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला चार दिवसांची सुटी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

दिवाळीनिमित्त बहुतांश सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुटीनंतर मंगळवारीपासून (ता. 17) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिवाळीनिमित्त शुक्रवारपासून (ता. 13) सोमवारपर्यंत (ता. 16) सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढला. विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षकांसह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुटी मिळाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिवाळीनिमित्त बहुतांश सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुटीनंतर मंगळवारीपासून (ता. 17) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या तीन दिवसांची सुटी व त्याला जोडून रविवारची सुटी आली आहे. अशा एकूण चार दिवसांच्या सुटीमुळे विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University four days leave