'कार्यशाळाच नाही, तर विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे?' पुणे विद्यापीठातील प्राध्यापक संभ्रमात!

Pune-University
Pune-University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करत द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रमात बदल केला आहे. पण यात मानवविज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा अद्याप घेण्यात आलेली नाही. तर, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेने ऑनलाईन कार्यशाळा घेण्यास सुरूवात केली आहे. 

पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने गेल्याच महिन्यात पदवी व पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाच्या बदललेल्या अभ्यासक्रमास मान्यता दिली. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासह प्रत्यक्षात कामाचा अनुभव मिळावा, रोजगारक्षम व नाविन्यपूर्ण गोष्टी करता याव्यात असे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. अभ्यासक्रम बदलला की संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते.

एक ऑगस्टपासून द्वितीय वर्षाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन व
ऑफलाईन सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्राध्यापकांना बदललेल्या अभ्यासावर प्रशिक्षणाचे धडे मिळणे गरजेचे आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात ९५० पेक्षा जास्त महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. यातील अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात तसेच पारंपरिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे असल्याने हे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे, असे प्राध्यापकांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत विद्यापीठाकडून माहिती घेतली असता, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनने प्रशिक्षण सुरू केले आहे. 

"मार्च महिन्यात एक प्रशिक्षण वर्ग झाला होता, मात्र नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. लाॅकडाऊनमुळे प्रवास करता येत नसल्याने पुढील काळात ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन करावे लागेल."
- डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान

"वाणिज्य शाखेतील बीबीए, बीकाॅमचे प्रशिक्षण वर्ग झाले आहेत, जून महिन्याच्या शेवटपर्यंत एमबीए सह इतर सर्व कोर्सचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण होईल. नवीन अभ्यासक्रमाची माहिती देण्यासह संबंधित विषयातील तज्ज्ञांसोबत संवादही होत आहे."
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन

"अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यासह इतर कोर्सचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांनी संयुक्तपण ७-८ कार्यशाळा झाल्या आहेत. पुढचे नियोजन ही सुरू आहे."
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान तंत्रज्ञान

प्रॅक्टीकलचे प्रशिक्षण अशक्य 
विज्ञान शाखेत प्रॅक्टीकलही महत्त्वाचे आहे, पण हा भाग केवळ २० टक्क्यांचा आहे. कोरोनामुळे हे प्रशिक्षण सध्या शक्य नाही, परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येणार आहे. दरम्यान, सध्याच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाला इतरवेळी पेक्षा प्राध्यापकांची उपस्थिती जास्त आहे, असे चासकर यांनी सांगितले. 

यासाठी असते कार्यशाळा 
- नवीन अभ्यासक्रमाची माहिती देणे
- त्याचे फायदे सांगणे
- शिकविण्यासाठीच्या नव्या पद्धतीचा अवलंब
- तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 
- संदर्भ पुस्तकांचा वापर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com