

Opposition to Mess Price Hike and Demand for University Subsidy
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठातील सर्व भोजनगृहांमधील (मेस) भोजनाचे दर प्रति थाळी १० रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. महागाईमुळे हा निर्णय घेण्यात आला असला, तरी या वाढीव १० रुपयांचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर टाकणे अत्यंत अन्यायकारक आहे. हा भार विद्यार्थ्यांनी न उचलता विद्यापीठाने संबंधित मेस चालकांना अनुदान स्वरूपात द्यावा, अशी आक्रमक भूमिका 'विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती'ने घेतली आहे. याबाबत शुक्रवारी (१८ सप्टेंबर) एक जाहीर प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे.