जिल्हा स्काऊट गाईडमध्ये  
सासवडच्या शाळेचे यश

जिल्हा स्काऊट गाईडमध्ये सासवडच्या शाळेचे यश

Published on

​सासवड, ता. १२ : चिंचवड येथील स्व. शंकरलालजी मुथा स्काऊट गाईड नगरीत झालेल्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात सासवडच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलने विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले.
या मेळाव्याचे उद्‍घाटन पुणे भारत स्काऊट गाईडचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुथा व जिल्हा संघटक दिगंबर करंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहाय्यक संचालक (क्रीडा) मिलिंद दीक्षित, संस्थेचे सहाय्यक सचिव अनिल कांकरिया उपस्थित होते. शिक्षणाधिकारी व स्काउटचे जिल्हा आयुक्त डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी शेकोटी कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले.
एकूण ३१ शाळांमधील १०१८ विद्यार्थ्यांच्या सहभागी असलेल्या या मेळाव्यात सासवडच्या ३७ विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळे शाळेने शोभायात्रा, शेकोटी कार्यक्रम, बिनभांड्याचा स्वयंपाक, चित्रकला आणि संचलन या विभागांत यश संपादन केले. यावेळी राष्ट्रीय जंबोरीत विद्यालयाला सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या मार्गदर्शिका शीतल बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल प्राचार्या रेणुकासिंग मर्चंट व उपप्राचार्या सुषमा रासकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com