पुण्यात होणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

- अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील मेरुमणी म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा नेहमीप्रमाणे पुणे शहरातच होणार.

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील मेरुमणी म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा नेहमीप्रमाणे पुणे शहरातच होणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात होणार नसल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये पसरत असून, त्यामध्ये तथ्य नसल्याचा खुलासादेखील यावेळी श्रीनिवास जोशी यांनी केला आहे. 

याबाबत श्रीनिवास जोशी म्हणाले, की पुण्याची शान असणारा सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव हा देशातील भारतीय शास्त्रीय़ संगीतातील सर्वांत मोठा महोत्सव यंदाही पुण्यातच होणार आहे. गेल्या 60 वर्षांची परंपरा असलेला हा महोत्सव डिसेंबर महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव दुसऱ्या कोणत्याही शहरात होणार नाही. प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरविल्या गेल्या तरी हा महोत्सव पुण्यातच होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawai Gandharva Bhimsen Festival to be held in Pune