
पुणे - अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा अवीट स्वरयज्ञ अशी ओळख असणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या यंदाच्या म्हणजेच ६९व्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावांची घोषणा बुधवारी (ता. २२) करण्यात आली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही उदयोन्मुख आणि दिग्गज कलाकारांच्या मिलाफाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली. यंदाचे वर्ष हे पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकारांचे महोत्सवातील सादरीकरण, हे यंदाचे वैशिष्ट्य असेल.
श्रीनिवास जोशी म्हणाले, ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ शास्त्रीय संगीताचा महोत्सव नसून ती एक चळवळ देखील आहे. नव्या जुन्या कलाकारांचा संगम साधण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असतो, याही वर्षी हा मेळ आम्ही साधला आहे.
१३ ते १७ डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव पार पडेल. महोत्सवाचा प्रारंभ तुकाराम दैठणकर आणि सहकाऱ्यांच्या सनईवादनाने होणार असून ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने सांगता होणार आहे.
अंकिता जोशी, पार्था बोस, रजत कुलकर्णी, प्राजक्ता मराठे, ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी, पौर्णिमा धुमाळे, यामिनी रेड्डी हे कलाकार यंदा प्रथमच महोत्सवात सादरीकरण करणार आहेत.’’
पहिला दिवस
१३ डिसेंबर : दुपारी ३ ते रात्री १०
तुकाराम दैठणकर आणि सहकारी (सनईवादन)
संजय गरुड (गायन)
कलापिनी कोमकली (गायन)
तेजेंद्र नारायण मजुमदार (सरोदवादन)
पं. उल्हास कशाळकर (गायन)
दुसरा दिवस
१४ डिसेंबर : दुपारी ४ ते रात्री १०
अंकिता जोशी (गायन)
पं. उपेंद्र भट (गायन)
पार्था बोस (सतारवादन)
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे (गायन)
तिसरा दिवस
१५ डिसेंबर : दुपारी ४ ते रात्री १०
रजत कुलकर्णी (गायन)
पद्मा देशपांडे (गायन)
नीलाद्री कुमार (सतारवादन)
पं. अजय पोहनकर (गायन)
चौथा दिवस
१६ डिसेंबर : दुपारी ४ ते रात्री १२
प्राजक्ता मराठे (गायन)
देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार (गायन व सतारवादन जुगलबंदी)
यामिनी रेड्डी (कुचीपुडी नृत्य सादरीकरण)
अभय सोपोरी (संतूरवादन)
बेगम परवीन सुलताना (गायन)
पाचवा दिवस
१७ डिसेंबर : दुपारी १२ ते रात्री १०
श्रीनिवास जोशी (गायन)
पौर्णिमा धुमाळे (गायन)
पं. सुहास व्यास (गायन)
ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी (कर्नाटक शास्त्रीय संगीत)
कौशिकी चक्रवर्ती (गायन)
रोणू मजुमदार (बासरीवादन)
डॉ. प्रभा अत्रे (गायन)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.