पुणे - नाना पेठेतील डोके तालीम परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून आठ वर्षांच्या सायली डंबे हिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक मुलगाही जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.