पुणे - पूर्वी स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजार झाल्यास अंधश्रद्धेतून बुवाबाजी, भोंदूंकडे घेउन जाणे असे प्रकार दिसून यायचे. मात्र, आता समाजात मानसिक आजारांबाबत जागृती वाढत असून नागरिक सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जात आहेत..लवकर उपचार घेतले तर नक्कीच हा आजार आटोक्यात राहू शकतो व रुग्ण सर्वसामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करू शकतो, अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले-शेख यांनी दिली.दरवर्षी २४ मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिन पाळला जातो. स्किझोफ्रेनिया यालाच मराठी मध्ये ‘छिन्नमनस्कता’ किंवा दुभंगलेले मन अशीही त्याची ओळख आहे. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. भास व भ्रम तसेच मनाचा विचारांचा गोंधळ होणे व वर्तनात बदल होणे हे या विकृतीचे मुख्य लक्षण आहेत..याची सुरवात युवा अवस्थेत होऊ शकते.सरकारी रूग्णालय, खासगी रुग्णालय, पुनर्वसन केंद्र येथे स्किझोफ्रेनिया या आजारावर उपचार होतात. आपल्या वागण्यात विचारात बदल जाणवल्यास त्वरित आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना जरूर सांगावे किंवा नातेवाईक-मित्रपरिवार यांना जर बदल जाणवल्यास त्वरित उपचार सुरु करावेत. त्याचबरोबर प्राणायाम, योगा, शारीरिक व्यायाम, छोटी छोटी कामे देणे तसेच रुग्णांनी आपले छंद जोपासणे ही महत्त्वाचे आहे, अशी माहिती तज्ज्ञ देतात..स्किझोफ्रेनिया होण्याची कारणे कोणती?मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मते या आजार होण्याची कारणे असंख्य आहेत. आनुवंशिकता, मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल,कौटुंबिक समस्या,स्पर्धात्मक आयुष्य, व्यसनांमुळे इत्यादी अनेक कारणे आहेत जी स्किझोफ्रेनिया या आजाराला कारणीभूत आहेत..स्किझोफ्रेनियाची लक्षणे कोणती?– भ्रम होणे, भास होणे, विचार करताना अडथळा निर्माण होणे– प्रेरणेची कमतरता, आपल्या भावनांना नीट व्यक्त न करता येणे– समाजापासून लोकांपासून दूर राहणे, संशय घेणे,– पुटपुटने, सतत किंवा असंबद्ध बडबड करणे.– कारण नसताना हसत राहणे, नैराश्य, अस्वछ राहणे ,अंघोळ न करणे आदी.स्किझोफ्रेनिया या आजाराला जितक्या लवकर ओळखता येईल तितक्या लवकर रुग्ण बरे होतात. अशा रुग्णांना आजाराची तीव्रता पाहून डॉक्टर रुग्णास बाह्यरुग्ण विभाग किंवा रुग्णालयात भरती करून उपचार देतात. यामध्ये औषधोपचार, विद्युत झटका देणे, सायकोथेरपी, समुपदेशन व कौशल्य प्रशिक्षण हे उपचार दिले जातात. याच बरोबर रुग्ण व नातेवाईक यांनी इच्छाशक्ती असणे जरुरी आहे. वेळोवेळी उपचारास हजर राहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज रुग्णांना औषधे देणे गरजेचे आहे. हे सर्व उपचार येरवडा प्रादेशिक रुग्णालयात उपलब्ध आहेत.- रोहिणी भोसले-शेख, समाजसेवा अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.