पुण्यातील अभ्यासकांनी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा नकाशाच केला तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुण्यातील अभ्यासकांनी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा नकाशाच केला तयार

पुण्यातील अभ्यासकांनी पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा नकाशाच केला तयार

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) प्रभाग रचनेचा नकाशा (Ward Structure Map) आज दिवसभर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हुबेहूब आयोगानेच नकाशा तयार केला असाच समजा नकाशा बघून होतो. मात्र हा नकाशा निवडणूक आयोगाने (Election Commission) तयार केलेला नाही तर पुण्यातील अभ्यासकांनी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी तयार करून तो सोशल मीडिया टाकला. मात्र, त्यावर त्यांनी स्वतःचा उल्लेख नसल्याने केल्याने पुण्याच्या प्रभाग रचनेचा नकाशा फुटला या चर्चेने जोर धरला आहे. याचा मनस्ताप प्रशासनातील अधिकार्यांना सहन करावा लागला.

पुणे महापालिकेची फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणारी निवडणूक किमान दोन महिने तरी पुढे जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यात 24 बदल सुचविले होते. त्यामुळे प्रशासनाने केलेली बहुतांश प्रभाग रचना बदलणार असल्याचे स्पष्ट झाले. या 24 बदलांसाठी आयोगाने महापालिकेला सादरीकरण करण्यासाठी दिलेली वेळ पुढे ढकलली त्यामुळे हे बदल ही अद्याप झालेले नाहीत. एकीकडे निवडणूक आयोगाकडून प्रक्रियेला वेळ लागत असताना दुसरीकडे नगरसेवक, इच्छुक उमेदवार यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. प्रभाग रचना निश्चित न झाल्यामुळे व तीन सदस्यांचा प्रभाव असल्याने 2017 च्या तुलनेत यावेळेस मोठा बदल होण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांना किंवा इच्छुकांना तयारी करताना नेमका कोणत्या भागात जोर लावावा हे कळत नाही.

हेही वाचा: पुणे : तेवीस गावात पाणीबाणी

राजकीय क्षेत्रामध्ये ही स्थिती असताना आज सकाळपासून पुण्याची प्रभाग रचना दाखवणारा एक नकाशा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये प्रभाग क्रमांक टाकून त्यांची नावेही देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तयार केलेला नकाशा फुटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक व्हाट्सअप ग्रुप वर हा नकाशा खरा आहे का अशीच चर्चा सुरू झाली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही या संदर्भात अनेक फोन केले पण या नकाशा बद्दल त्यांना काही माहिती नसल्याने नेमक्या कोणत्या नकाशा बद्दल चौकशी केली जात आहे हे देखील त्यांचा गोंधळ उडाला आणि मनस्तापही सहन करावा लागला. दरम्यान हा नकाशा भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केस्कर आणि सुहास कुलकर्णी यांनी तयार केला असून तो सोशल मीडियावर व काही पत्रकारांना आमचा अभ्यास असल्याचे सांगत शेअर केला होता.

याबाबत उज्वल केस्कर म्हणाले, प्रभाग रचना हा फार अवघड विषय नाही. प्रशासन वेळ काढत होते, त्यामुळे आम्हीच ठरविले की आपण मार्गदर्शक सूचनेनुसार काही करू आणि नकाशा तयार केला. हा प्रयोग आहे, प्रभाग रचना अशीच असेल असा आमचा दावा नाही. महापालिकेकडे यंत्रणा आहे, आमच्याकडे ही यंत्रणा नसताना ही नकाशा तयार केला, असेही केसकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top