

Scholarship Exam
sakal
पुणे - इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेचा यशवर्धन थोरात याने ९८.६६ टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सातवीच्या परीक्षेत वसेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेची प्रदिशा गाडे हिने ९६ टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.