
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) या परीक्षांचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार रात्री आठ वाजता जाहीर करण्यात आल्या.