Pune : नामांकित शैक्षणिक संस्थांसाठी सारथी कडून शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarthi Sanstha

Pune : नामांकित शैक्षणिक संस्थांसाठी सारथी कडून शिष्यवृत्ती

पुणे : मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठीच्या अटी..

- राज्य बोर्डातून दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावी

- बारावीच्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक

- पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पदवीचे गुण तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी १२वीचे गुणांनुसार क्रमवारी

- पदवीसाठी २५ तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ३०ची कमाल वयोमर्यादा

- इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा नसावा

महत्त्वाचे...

अर्ज करण्याची शेवटची मुदत : २१ सप्टेंबर

सारथी संस्थेत कागदपत्र सादर करण्याची मुदत : ३० सप्टेंबर

संकेतस्थळ ः https://www.sarthi-maharashtragov.in/

आकडे बोलतात...

एकूण शिष्यवृत्तीची संख्या ः ३००

मुलींसाठी राखीव जागा ः ५० टक्के