पुणे पोलिसांना विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधनानिमत्त राख्यांची भेट

राखी पौर्णिमेच्या पुर्वसंध्येला मिळालेल्या भेटीने पोलिस अधिकारीही भारावले
रक्षाबंधनानिमत्त
रक्षाबंधनानिमत्त sakal

पुणे : कोरोनाचा (corona) संसर्ग शिगेला पोचला असतानाच पोलिसांनी (police) दिवस-रात्र, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत रस्त्यावर उभे राहून पुणेकरांचे (Pune) रक्षण केले, त्याचबरोबर अडचणीत सापडलेल्या हजारो नागरिकांना 'सोशल पोलिसींग सेल'द्वारे अन्नपाणी आणि घरी परतण्याची सोयही केली. या सगळ्या घटनेमध्ये काही पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले, तर उर्वरीत पोलिस दल अजूनही कोरोनाविरुद्ध लढा देत आहे, त्यांच्या अविरत सेवेबद्दल काही शाळा-महाविद्यालयांनी (school colleges pune) पुणे पोलिसांना (pune police) 400 राख्या पाठवून त्यांच्याबद्दल कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.

सरस्वती विद्यालय युनीयन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने पुणे पोलिसांना राखी पौर्णिमेच्या पुर्वसंध्येला ही आगळीवेगळी भेट दिली. प्राचार्य अनिलकुमार पोळ, क्रीडा शिक्षक रोहित इंगवले यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्याकडे राख्यांचे बॉक्‍स सुपुर्द केले. डॉ.शिसवे यांनी या राख्यांचे बॉक्‍स शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देऊन सर्वांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था केली.

रक्षाबंधनानिमत्त
पिंपरी : रविवारी मिळणार 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस

डॉ.शिसवे म्हणाले, "पोलिसांकडून नागरिकांसाठी कायम चांगले काम केले जाते. हे काम शाळांमार्फत आमच्यापर्यंत समजणे, ही पुणे पोलिस दलासाठी अभिमानाची बाब आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांसाठी राख्या बनवाव्या वाटणे आणि त्या आमच्यापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करणे, ही आमच्यासाठी भावनिक गोष्ट आहे. आपण आमच्यावर दाखविलेला विश्‍वास पुणे पोलिस कायम सार्थ करतील.''

समर्थ पोलिसांकडून आमच्या शाळेला कायमच सहकार्य केले जाते. तसेच विविध उपक्रमांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो, असे पोळ यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com