पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाही करण्यात आल्याची माहिती दिली. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री मात्र ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. 

पुणे : शहर व उपनगरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज (गुरुवार) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाही करण्यात आल्याची माहिती दिली. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री मात्र ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. 

शहरात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात 94 मिलिमीटर पावसाची नोंद 2011 मध्ये झाली होती. आठ वर्षांनंतर एका रात्रीत 87.3 मिलिमीटर पाऊस पडल्याची घटना पुण्यात घडली. मंगळवारी (ता. 24) सकाळी साडेआठ ते बुधवारी (ता. 25) सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये हा पाऊस कोसळला. 

पुण्यात या वर्षी 1 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरदरम्यान 326.4 मिलिमीटर पाऊस पडला. त्यापैकी 143.2 मिलिमीटर पाऊस अवघ्या 48 तासांमध्ये पडला. यापूर्वी दहा वर्षांत इतक्‍या कमी वेळेत एवढा पाऊस पडल्याची हवामान खात्यात नोंद झालेली नाही. सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत काळे ढग आकाशात दाटून येतात. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते गडद काळ्या रंगांचे होऊन विजांचा कडकडाट होऊ लागतो आणि जोरदार पावसाला सुरवात होते, असे चित्र दोन दिवस पुण्यात दिसत आहे, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school and colleges closed for heavy rainfall in Pune