#SchoolBag कमी होईना ओझे

School Bag
School Bag

पुणे - चिमुकल्यांच्या खांद्यावरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आदेश काढले ... अंमलबजावणीचा आग्रह धरला. परंतु, शैक्षणिक संस्था काही मनावर घेईनात... त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचे ओझे कायमच असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत मंगळवारी आढळून आले. या बाबत नेमक्‍या काय उपाययोजना केल्या पाहिजेत, हेच या शिक्षण संस्थांना कळेनासे झाले आहे, अन्‌ त्यामुळे पालकही मेटाकुटीला आले आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजनमर्यादा निश्‍चित केली असून, विविध विषयांचे अध्यापन आणि गृहपाठाबाबतही मार्गदर्शक नियमावली कार्यान्वित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही शाळांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात ‘सकाळ’ने पाहणी केली. 

शाळांमध्ये केलेल्या उपाययोजना -
 पाठ्यपुस्तके ठेवण्यासाठी लॉकर
 दोन विषयांसाठी एकच वही
 पाठ्यपुस्तकांचे दोन सेट (एक शाळेत आणि दुसरा घरी)
 पाण्याच्या बाटलीचे वजन कमी करण्यासाठी वॉटर प्युरिफायर यंत्रणा
 ई-लर्निंगचा प्रभावी वापर

खांद्यावरील ओझ्यामुळे हे होऊ शकते...
 पाठ, मान, खांदेदुखी
 मणका आणि सांध्यावर परिणाम
 मणक्‍यांचा आकार बदलण्याची शक्‍यता
 ओझ्यामुळे दमछाक होऊन उत्साह कमी होऊ शकतो

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने उचललेले पाऊल निश्‍चितच योग्य आहे; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार का, हा प्रश्‍न आहे. दप्तराचे वजन उचलणे कधी कधी आपल्यालाही शक्‍य होत नाही. ते ओझे पाठीवर घेऊन मुलांची दमछाक होते.
- विकास वानखेडे, पालक

पाठीवर सातत्याने दप्तराचे ओझे घेतल्यामुळे साधारणत: ३० टक्के मुलांना कमी-अधिक प्रमाणात मान, खांदे, पाठदुःखी होत असल्याचे दिसून येते. या ओझ्यामुळे पाठीला बाक येणे, मणक्‍याच्या आकारात बदल होणे, मान पुढे झुकलेली राहणे, असे मुलांच्या शारीरिक रचनेत बदल होतात. याकडे दुर्लक्ष केल्यास हे बदल कायमस्वरूपीही राहू शकतात.
- डॉ. अतुल सोनावणे, अस्थिरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com