शालेय क्रिकेट स्पर्धा

शालेय क्रिकेट स्पर्धा
Published on

फर्ग्युसन कॉलेज ः येथील मैदानावर सुरू असलेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूल विरुद्धच्या लढतीत धनकवडीच्या भारती विद्यापीठ प्रशालेचा अभिमन्यू कदम सुरेख फटका मारताना.
--------------
विमलाबाई गरवारे, ज्ञानांकुर, भारती विद्यापीठ प्रशालेची प्रतिस्पर्ध्यांवर मात
शालेय क्रिकेट स्पर्धा

पुणे, ता. १९ ः शिक्षण विभाग पुणे मनपा आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या शालेय क्रिकेट स्पर्धेत विमलाबाई गरवारे प्रशाला, ज्ञानांकुर संघ, धनकवडी आणि भारती विद्यापीठ, धनकवडी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सोहम काळे, राघव बनकरच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर विमलाबाई गरवारे प्रशालेने गोळवलकर गुरुजी शाळेवर एका धावेने विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना गरवारे प्रशालेने बिनबाद ४८ धावा केल्या. प्रत्युत्तर देताना गोळवलकर गुरुजी प्रशालेला सहा बाद ४७ धावा करता आल्या. राघव बनकरने तीन, तर सोहम काळेने दोन गडी बाद केले.
दुसऱ्या लढतीत धनकवडीच्या ज्ञानांकुर संघाने न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशालेचा आठ गडी राखून पराभव केला. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशालेच्या तीन बाद ४३ धावांस उत्तर देताना ज्ञानांकुर संघाने दोन बाद ४४ धावा करून विजय मिळविला.
तिसऱ्या लढतीत भारती विद्यापीठ, धनकवडीने न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूलचा दहा गडी राखून पराभव केला. न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूलच्या चार बाद ३६ धावांस उत्तर देताना भारती विद्यापीठाने बिनबाद ३७ धावा करून विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक :
१) विमलाबाई गरवारे प्रशाला - (६ षटकांत) बिनबाद ४८ धावा (सोहम काळे नाबाद २४, राघव बनकर नाबाद १५) विजयी विरुद्ध गोळवलकर गुरुजी स्कूल- (६ षटकांत) ६ बाद ४७ (अमेय कुलकर्णी १३, राघव बनकर ३-१७, सोहम काळे २-१७);
२) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड प्रशाला - (६ षटकांत) ३ बाद ४३ (शौर्य दारवटकर नाबाद १३, महंमद बिलाल शेख नाबाद ८, अर्पित चिकणे २-१४, श्रेयस वालगुडे १-१८) पराभूत विरुद्ध ज्ञानांकुर संघ, धनकवडी - (५.५ षटकांत) २ बाद ४४ (श्लोक ढवळे नाबाद ९, आदित्य घुटुगडे ९, ईशान महाजन १-१०);
३) न्यू इंग्लिश सेकंडरी स्कूल, शनिवार पेठ - (६ षटकांत) ४ बाद ३६ (नीरज पारखे नाबाद १२, अद्विक हाडके ८, मानव सोळंकी २-९) पराभूत विरुद्ध भारती विद्यापीठ, धनकवडी - (३.४ षटकांत) बिनबाद ३७ धावा (श्‍लोक शेडगे नाबाद १३, अभिमन्यू कदम नाबाद १४).
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com