
कात्रज : राज्य मंडळाच्या मराठी शाळा आज (ता.१६) सुरू झाल्या. मात्र शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी कात्रज-कोंढवा रस्ता येथील मुनोत प्राथमिक विद्यालय बंद होते. शिक्षक आणि संस्थाचालकाच्या वादात ही शाळा अडकली असून ती आज बंद होती. पहिल्याच दिवशी शाळा न भरल्याने विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांसह पालकांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसह काही काळ कात्रज-कोंढवा रस्ता अडविला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला. काही काळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.