Ayodhya Verdict : पुण्यात आज दुपारच्या शाळा बंद; सकाळी भरलेल्या शाळा १० वाजता सोडल्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

Ayodhya Verdict : पुणे : अयोध्येतील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आज (शनिवारी) दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सकाळच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजता घरी सोडून देण्यात आले  आहे. 

Ayodhya Verdict : पुणे : अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आज (शनिवारी) दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सकाळच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजता घरी सोडून देण्यात आले  आहे. 

राम जन्मभूमीच्या खटल्याचा निकाल आज सकाळी साडे दहा वाजता जाहीर केला जात आहे. शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरी, अचानक अनुचित प्रकार घडू शकतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थांना कोणताही त्रास होऊ नये, ते सुरक्षित घरी जावेत यासाठी शिक्षण विभागाने सुरक्षेची खबरदारी म्हणून सकाळी याबाबत सर्व शाळांना सुचना दिल्या. 

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे म्हणाले, ''आज सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या आहेत, पण १० वाजता शाळांमधील विद्यार्थी घरी सोडून द्यावेत अशा सूचना पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. तर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School will be closed during the afternoon session in Pune due to Ayodhya Verdict