Pune : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मोटारीच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मोटारीच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू

भिगवण : राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला राहत असलेली शाळकरी मुलगी शनिवारी(ता.२०) सकाळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडुन शाळेला जात असताना भरधाव वेगातील क्रेटा मोटार कारने धडक देऊन झालेल्या अपघातांमध्ये मयत झाली आहे. नटुन थटुन शाळेला निघालेल्या शाळकरी मुलीचा कार अपघातात मृत्यू झाल्याने विदयार्थी, शिक्षक व पालक वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.

अनुष्का अनिल गायकवाड(वय.१३ रा. राजेगांव,ता.दौंड, हल्ली यश हाईट्स भिगवण, ता.इंदापुर) असे अपघातामध्ये मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी अनिल गायकवाड(वय. ४५,रा.राजेगांव,ता.दौंड, हल्ली यश हाईट्स भिगवण, ता.इंदापुर) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अनुष्का अनिल गायकवाड ही येथील आदर्श विदयालयामध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. शनिवारी(ता.२०) सकाळी शाळा असल्यामुळे ती रहात असलेल्या यश हाईटस् या राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील वसाहतीमधुन पुर्वेला असलेल्या आदर्श विदयालय या शाळेला निघाली होती.

राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पुणे बाजुकडुन सोलापुर बाजुकडे निघालेल्या भरभाव क्रेटा मोटार कारने(क्र.एम एच १४ जे एम ९५०५) तिला जोरदार धडक दिली त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. येथील सरकारी रुग्नालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले असता ती मयत झाल्याचे उपचार करणाऱ्या वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातांमध्ये शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच भिगवणवर शोककळा पसरली. विदयार्थी, शिक्षक व पालक वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी कार चालक मंदार गोपाल दामले(वय ४७ रा. निगडी प्राधीकरण पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री.सोननिस करीत आहेत.

महामार्ग प्रशासन आणखी किती बळी घेणार

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गामुळे भिगवण शहराचे दोन तुकडे झाले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुच्या लोकांना विविध कारणांसाठी दोन्ही बाजुला ये-जा करावी लागते. ये-जा कर असताना अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहे. भिगवण ग्रामपंचायत व हॉटेल येथहॉटेल दिलबहारच्या जवळ बोगदा किंवा पायी ये-जा करणाऱ्यासांसाठी पादचारी पुलाची आवश्यकता आहे. याबाबत महामार्ग प्रशासनाकडे ग्रामस्थांची वारंवार मागणी करुनही जाणिवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. महामार्ग प्रशासन आणखी किती निष्पापांचे बळी घेणार असा प्रश्न सामान्यांमधुन उपस्थित होत आहे.

loading image
go to top