शाळा ही चांगले विचार घडविणारे केंद्र: मकरंद अनासपुरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

  • दिवे येथे 2 हजार माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
  • माजी विद्यार्थ्यांनी केली 8 लाखांची देणगी जमा

गराडे (पुणे): समाजा विषयी प्रेम व कृतज्ञता असली म्हणजे चांगल्या गोष्टी होत असतात. विद्यार्थी मोठा झाला यात शिक्षकाला आनंद असतो. संस्कृती घराची, पाण्याची, प्राण्याची, वृक्षांची, निसर्गाची पुजा करते आणि ही संस्कृती जपणारी शाळा ही ज्ञान मंदिरे आहेत. तसेच शाळा ही चांगले विचार घडविणारे केंद्र आहेत, असे प्रतिपादन सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

दिवे (ता. पुरंदर) येथील श्री कातोबा हायस्कूल येथे रविवारी (17 जून) शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे शताब्दी वर्षा निमित्ताने दिवे शाळेतील गेल्या पन्नास वर्षातील सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्नेहमहामेळावा व कातोबा हायस्कूल सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्य मंत्री दादासाहेब जाधवराव हे होते. यावेळी अभिनेते अनासपुरे बोलत होते.

माजी संपादक अनंत दीक्षित, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुर, कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा परिषद सदस्या ज्योती झेंडे, प्राचार्य ए. एन. पाटील, हनुमंत कुंभार, तानाजी झेंडे, विलठ्ठआप्पा झेंडे आदी उपस्थित होते.

या महामेळाव्यात शाळेसाठी जागा दिलेले, हायस्कूल सुरु करणारे, जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, गेल्या पन्नास वर्षाच्या आठवणींची स्मरणिका प्रकाशन, माजी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, मनोरंजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते. माजी संपादक अनंत दीक्षित, अभयकुमार साळुंखे, दिलीप झेंडे, दादासाहेब जाधवराव आदींनी आपले विचार व्यक्त केले. स्वागताध्यक्ष व म्हाडाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव झेंडे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन स्वाती साठे यांनी केले. तर आभार सुधारकर टिळेकर यांनी मानले.

Web Title: Schools A Better Thinking Center says actor Makrand Anaspure