School Management Committee office-bearers and the headmaster inspecting the nutritious meal at a primary school manchar
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या २७८ प्राथमिक शाळांमध्ये १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले, तरी लांडेवाडी व मोरडेवाडी केंद्रांतर्गत २२ शाळांना मंगळवारपर्यंत (ता. १) शालेय पोषण आहारासाठी आवश्यक धान्याचा पुरवठा झालेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षकांना विद्यार्थ्यांची दुपारची भूक भागविण्यासाठी उसनवारीने धान्य जमा करण्याची वेळ आली आहे.