Pune : सीएसआयआर नेटचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSIR NET 2021

Pune : सीएसआयआर नेटचा निकाल जाहीर

पुणे : विज्ञान शाखेतील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आणि संशोधन शिष्यृत्तीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात सीएसआयआर-नेटचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. देशभरातील सुमारे एक लाख ६२ हजार उमेदवारांनी सप्टेंबर २०२२ मध्ये ही परीक्षा दिली होती. सीएसआयआर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२२ च्या सत्राची ही परीक्षा होती.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) वतीने राष्ट्रीय परीक्षा एजेंसीच्या माध्यमातून देशभरातील १६६ शहरांत ही परीक्षा पार पडली होती. सुमारे दोन लाख २१ हजार अर्जदारांपैकी प्रत्यक्ष एक लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात सर्वाधिक विद्यार्थी हे जीवन विज्ञानाशी निगडीत होते. तर तब्बल एक लाख २० हजार विद्यार्थी कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीसाठी इच्छूक होते. उमेदवारांना https://csirnt.nta.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहायला मिळेल.