भोसे : हॅपी अवर्स''च्या चिमुकल्या शास्त्रज्ञांची भरारी! हायड्रोलिक रोबोट ते भूकंप शोधक यंत्रांपर्यंत विविध प्रकल्पांचे सादरीकरण; प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
हायड्रोलिक रोबोटपासून जलसंधारणापर्यंत
‘हॅपी अवर्स’मधील विद्यार्थ्यांच्या प्रयोगांनी उजळला विज्ञान दिन
भोसे, ता. ४ : येथील हॅपी अवर्स हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित केलेल्या भव्य विज्ञान प्रदर्शनाने शाळेचा संपूर्ण परिसर विज्ञानमय झाला होता. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रयोग आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी या चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सना लतिफ नॅन्सी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील कठीण संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने प्रयोगांद्वारे मांडल्या. प्रदर्शनामध्ये हायड्रोलिक रोबोट, जंपिंग मॅन, भूकंप शोधक यंत्र, मॅग्नेटिक कार, सोलर पॅनलचे कार्य, रेन डिटेक्टर, जलसंधारण प्रकल्प आणि प्लॅस्टिक पुनर्वापर अशा ज्वलंत विषयांवरील प्रकल्पांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणामधून त्यांची सर्जनशीलता आणि विज्ञानाबद्दलची ओढ प्रकर्षाने जाणवत होती.
या यशस्वी उपक्रमाबाबत बोलताना शाळेचे मुख्याध्यापक नितीन प्रभाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आजचे युग हे विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक वृत्ती निर्माण करणे हेच आमच्या शिक्षण पद्धतीचे ध्येय आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांनी ‘करून पाहा’ या तत्त्वाचा अवलंब केला आहे. विज्ञान हीच भविष्याची दिशा असून, अशा उपक्रमांमुळे उद्याचे महान शास्त्रज्ञ याच वर्गांमधून घडतील, असा विश्वास वाटतो.’’
हा कार्यक्रम यशस्वितेसाठी सैफुल्ला वारणे, स्नेहा सपकाळ व सर्व वर्गशिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. विज्ञानाची ताकद आणि भविष्यातील संधी यावर या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला. केदार कारंजकर यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे पाचगणी शैक्षणिक क्षेत्रात ‘हॅपी अवर्स’च्या विज्ञान दिनाची चर्चा रंगली आहे.
07378
पाचगणी : आपल्या प्रयोगाची माहिती उपस्थितांना देताना विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

