अवती भवती साठी

अवती भवती साठी

Published on

कर्मवीर विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात
बार्शी शहर : कर्मवीर विद्यालय, चारे येथे विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक शिक्षण निरीक्षक अनिल बनसोडे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य हनुमंत चव्हाण, माजी विद्यार्थिनी ऋतुजा मोरे उपस्थित होते. विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर प्रभावी भाषणे सादर केली. शिक्षकांनीही विज्ञान विषयक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. यावेळी श्रीमती मडके यांनी महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या सिद्धांताची सविस्तर व सोप्या शब्दांत मांडणी करून विद्यार्थ्यांची दाद मिळवली. माजी विद्यार्थिनी ऋतुजा मोरे यांनी यशस्वी प्रवासाचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य आणि तंत्रज्ञानाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला. तसेच यशस्वी होण्यासाठी मुलांनी अभ्यासरूपी कष्ट घेतले पाहिजे, असे सांगितले.
---
BAR26B13120
बार्शी ः दीपाली सबसगी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.

दीपाली सबसगी यांना राज्यस्तरीय पुरस्कार
बार्शी शहर : नालगाव (ता. परांडा) येथील जि. प. शाळेच्या सहशिक्षिका दीपाली सबसगी यांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२६ मधील प्राथमिक गट व पूर्व माध्यमिक स्तर गटातून राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. भरड धान्य वापरूया, आरोग्य सुदृढ करूया. या विषयावर त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने येथे २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. यासाठी राज्यातील १ हजार १७० नवोपक्रम आले होते. त्यापैकी ७० नवोपक्रम राज्यावर ऑनलाइन व ऑफलाइन सादरीकरण करण्यासाठी निवडले गेले. त्यातून प्राथमिक गटातून दहा स्पर्धकांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमास संचालक डॉ. हेमंत वसेकर, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. नदाफ, प्राचार्य ह. ना. जगताप, संशोधन विभागातील मान्यवर तसेच सर्व परीक्षक आणि स्पर्धक उपस्थित होते. सबसगी यापूर्वी जि. प. प्रशाला सिरसाव येथे कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी हा उपक्रम त्यांच्या इयत्ता सातवीच्या वर्गात राबविला. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये दुकानाचे तेलकट, मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय जास्त होती. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या. त्यावर उपाय म्हणून त्याच चवीचे पण आरोग्यदायी पदार्थ भरड धान्यापासून तयार करून विद्यार्थ्यांच्या आहारापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com