आदर्श इंद्रजीत विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात ; विज्ञान प्रदर्शनात शिवतेज,साहिल,तीर्थराज प्रथम

आदर्श इंद्रजीत विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात ; विज्ञान प्रदर्शनात शिवतेज,साहिल,तीर्थराज प्रथम

Published on

MHD26B05097
महूद (ता. मोहोळ) : येथील आदर्श इंद्रजीत विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

आदर्श इंद्रजीत विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
.........
महूद : येथील आदर्श इंद्रजीत विद्यालयात विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शनात शिवतेज वाघमोडे, साहिल खुळे, तीर्थराज कांबळे यांनी विविध गटात प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी मुख्याध्यापक अभिमन्यू पवार, विकास भोसले, प्राचार्य उमेरा तांबोळी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स सादर केली. जलसंवर्धन, सौरऊर्जा, पर्यावरण संरक्षण, अवकाश संशोधन यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी लहान वैज्ञानिक प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञान प्रदर्शनामध्ये लहान गटात शिवतेज वाघमोडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रणव नागणे याने द्वितीय क्रमांक तर आरोही तरटे हिने तृतीय क्रमांक मिळविला. मोठा गटात साहिल खुळे याने व तीर्थराज कांबळे यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. तर ईश्वरी पवार व तनुजा गोडसे यांनी द्वितीय क्रमांक तर श्रेयश मोरे याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात विज्ञान शिक्षक गळवे, ज्ञानेश्वर कदम, अमृता महाजन, ए. डी. लवटे यांनी मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून श्री. खांडेकर, श्री. लोखंडे, श्रीमती वाघ व बागल यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन माधुरी भोसले व होळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com