आनंदनगरच्या डॅफोडिल्स शाळेतील विज्ञान प्रदर्शनामध्ये १६० प्रकल्प
वालचंदनगर, ता. १ ः आनंदनगर (ता. इंदापूर) येथील डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ४५० विद्यार्थ्यांनी १६० प्रकल्प सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी गट तयार करुन प्रकल्प सादरीकरण केले. यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प, मिशन सिंदूर, आधुनिक शेती, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जेच्या विविध स्त्रोतावर प्रकल्प, सौर ऊर्जेचा दैनंदिन जीवनातील वापरातील प्रकल्प, तापमान वाढीसंबंधीचा प्रकल्प, पर्यावरण संवर्धन प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्षेपणास्त्राचे प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनाला पालक व परिसरातील नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्या संस्थापिका तेजस्विनी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्य मंजिरी बुचके, प्रसन्ना कुलकर्णी व शिक्षकांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

